WhatsApp New Features

 Whatsapp New Features : व्हॉट्सअ‍ॅप बनलं कलरफुल अन् म्यूजिकल; अपडेटमध्ये आले नवे 5 फीचर्स, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर,:🖇️

whatsapp 5 new features : व्हॉट्सअ‍ॅपने ५ नवीन फीचर्स लॉन्च केली आहेत ज्यामुळे मेसेजिंग अनुभव आणखी आकर्षक बनणार आहे. रंगीबेरंगी थीम्स, व्हिडिओ प्ले बॅक स्पीड, आणि एआय इंटिग्रेशनसारखी फीचर्स उपलब्ध आहेत

Whatsapp New Features : व्हॉट्सअ‍ॅप जगभरातील सर्वात लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आता वापरकर्त्यांसाठी ५ नवीन फीचर्स आणले आहेत, ज्यामुळे मेसेजिंग आणखी सोपी, आकर्षक आणि स्मार्ट होईल. हे नवीन फीचर्सचॅट कस्टमायझेशन, अपडेटेड नोटिफिकेशन, न वाचलेले मेसेजेस काउंट, व्हिडिओ प्ले बॅक स्पीड आणि एआय इंटिग्रेशनसह येत आहेत. यामुळे वापरकर्त्यांना नवीन आणि अधिक इंटरएक्टिव्ह अनुभव मिळेल.


व्हॉट्सअ‍ॅपने या फीचर्सची सुरुवात बीटा वापरकर्त्यांमध्ये चाचणी करून केली होती. आता हे फीचर्स संपूर्ण जगभरातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. चला तर मग पाहूया व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवे फीचर्स..

१. रंगीबेरंगी थीम्ससह चॅट कस्टमायझेशन👇


👉व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांना चॅट बॅकग्राऊंडवर पर्सनलाईजची सुविधा दिली आहे. यापूर्वी वापरकर्त्यांकडे फक्त काहीच बॅकग्राऊंड निवडण्याचे पर्याय होते, पण आता व्हॉट्सअ‍ॅपने २० रंगीबेरंगी थीम्स आणि ३० नवे वॉलपेपर आणले आहेत. यामुळे वापरकर्ते त्यांच्या आवडीचे रंग निवडून चॅट्सला आकर्षक बनवू शकतात.


👉२. चॅट नोटिफिकेशन्स🔔🔊


👉व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फिचर आणले आहे ज्याद्वारे वापरकर्त्यांना मेसेज नोटिफिकेशन्स अधिक नियंत्रणात ठेवता येतील. अनेक वापरकर्त्यांना न वाचलेले मेसेजेस दर्शवणारा डॉट त्रासदायक वाटतो. यामुळे नको असणाऱ्या सूचना टाळता येतील आणि वापरकर्त्यांना अधिक सुसंगत अनुभव मिळेल. हे फिचर नोटिफिकेशन सेटिंग्समध्ये उपलब्ध आहे.

३. मेसेजेस काऊंटर📩💌


👉व्हॉट्सअ‍ॅपने चॅट फिल्टर्सची सुविधा आणल्यापासून वापरकर्त्यांना मेसेजेस अधिक सोप्या पद्धतीने मॅनेज करता येत आहेत. आता यामध्ये न वाचलेले मेसेजेस दाखवणारा काऊंटर जोडण्यात आला आहे. यामुळे वापरकर्त्यांना थेट फिल्टरमध्येच न वाचलेले मेसेजेस काउंट पाहता येतील आणि महत्वाचे मेसेजेस मिस होणार नाहीत.


४. व्हिडिओ प्ले बॅक स्पीडमध्ये बदल🎥📽️📺


👉व्हॉट्सअ‍ॅपने एक लोकप्रिय फीचर सादर केले आहे ज्याद्वारे वापरकर्ते व्हिडिओचे प्ले बॅक स्पीड बदलू शकतात. यापूर्वी हे फीचर फक्त व्हॉइस नोट्ससाठी उपलब्ध होते, पण आता वापरकर्त्यांना व्हिडिओ 1.5x किंवा 2x गतीने पाहता येणार आहे. हे लांब व्हिडिओ पाहताना विशेषतः उपयोगी ठरते.


५. मेटा एआय विजेट🖥️💻


👉व्हॉट्सअ‍ॅपने एआय आधारित फीचरचा आणखी एक टप्पा सादर केला आहे. आता वापरकर्ते मेटा एआय विजेट त्यांच्या फोनच्या होम स्क्रीनवर ठेवू शकतात, ज्यामुळे त्यांना एआय चॅटबोटसाठी त्वरित ऍक्सेस मिळेल. एकदाच टॅप करून वापरकर्ते एआय चॅटबोटला उघडू शकतात आणि त्याच्या सहाय्याने वेगवेगळ्या कामांसाठी मदत घेऊ शकतात.


🤝💆🌐🗺️व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन वैशिष्ट्यांमुळे वापरकर्त्यांचा अनुभव निश्चितच अधिक वेगवान, सोयीस्कर आणि मनोरंजक होईल.📢📱🪙 कंपनी नियमितपणे तिच्या प्लॅटफॉर्मचे अपडेट्स करत आहे, ज्यामुळे गोपनीयता, सुरक्षा आणि कस्टमायझेशनची सुविधा अधिक चांगली होईल.🎓✅

Comments

Popular posts from this blog

🏆Team India ka agla Captain Hardik bhai 🏆

How To make Ai literature

Want to win Ai in the Age